

मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी फाटा ते मंचर (ता.आंबेगाव ) या रस्त्यावर वैद्यवाडी फाटा नजीक बुधवार (दि.१८) रोजी सकाळी सात वाजण्याचा सुमारास जारकरवाडी हद्दीतील वैदवाडी रस्त्यावरील खांबाचा अंदाज न आल्याने कार खांबाला धडकल्याने कार मधील एक जखमी झाला आहे. रस्त्याला अडथळा ठरणारा विद्युत पोल तात्काळ हटवावा अशी मागणी नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य अंकिता वाळुंज यांनी महावितरण विभागाकडे केली आहे
या संदर्भात समजलेली माहिती अशी की सदर कार एमएच-१२/ व्हीवो-६७५९ या कारने तिघे जण वैद्यवाडी फाटा मार्गे मंचरला जात असताना या रस्त्यालगत तापकीर वस्ती जवळ ३३ केव्हीचा विद्यूत खांब आहे.या खाबांचा अंदाज न आल्याने कार विद्यूत खाबांला धडकली व ३३ केव्हीची विद्यूत तार तटली पण तार वरच्या वर अडकली व त्या ठिकाणी मोठा जाळ झाल्याचे या ठिकाणी उपस्थित असणार्या ग्रामस्थांनी सांगितले.

मात्र एअर बॅग उघडल्याने मोठा अपघात होता होता टळला व कारमधील एक जण जखमी झाल्याने त्याला पारगाव या ठिकाणी दवाखान्यात हलवण्यात आले.
अपघातात जखमी झालेल्यांची नावे मात्र समजू शकली नाही. सदर रस्त्याचे काम तीन वर्षापूर्वी झाले आहे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याला अडथळा ठरणाऱ्या विद्युत पोलची माहिती महावितरण कंपनीला देऊन सदर विद्युत पोल हटविला पाहिजे होता परंतु संबंधित ठेकेदाराने याकडे दुर्लक्ष करून रस्त्याचे काम केले आहे एखादी मोठी दुर्घटना घडल्यास याला जबाबदार सार्वजनिक बांधकाम विभाग की महावितरण हा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे.

सदर विद्यूत खांब महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभागाने एखाद्या मोठ्या अपघाताची वाट न पाहाता त्वरीत हटवावा यावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष दिपक विधाटे यांनी केली आहे.





