spot_img
spot_img
spot_img

काठापूरात बैलगाडा शर्यतीत ३२० बैलगाडा मालकांचा सहभाग

मंचर प्रतिनिधी

यात्रा उत्सवा निमित्त काठापुर बुद्रुक ( ता . आंबेगाव ) येथे आयोजित बैलगाडा शर्यतीमध्ये ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला. यावेळी बैलगाडा मालकांना एकूण.१५२००० ईनाम वाटप करण्यात आला.

काठापुर बुद्रुक येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्री निमित्त यात्रा उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी दोन दिवस चाललेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये एकूण ३२० बैलगाडा मालकांनी भाग घेतला.

घाटाचा राजा म्हणून किशोर करंडे/प्रकाश मेचे,रुद्रांश दाते/अंकुश बढेकर यांच्या बैलगाड्याने मान मिळवला.प्रथम क्रमांक फळीफोडचा मान रुंद्रांश दाते/बारकु जगताप, निलेश गाडगे यांनी तर फायनल मध्ये प्रथम क्रमांक श्रीकृष्ण वाव्हळ,उमेश भोर /निलेश वाघ यांनी द्वितीय क्रमांक सुभाष वाळुंज, मधुकर जोरी/राजु जोरी यांनी पटकावला,तृतीय क्रमांक किशोर करंडे/ प्रकाश मेचे,कै.तुकाराम जाधव यांनी मिळवला.

यावेळी यात्रेची व्यवस्था अध्यक्ष किशोर करंडे, उपाध्यक्ष अशोक जोरी, मंगेश करंडे,काळुराम टिंगरे,अशोक करंडे, विशाल करंडे,अमोल करंडे, शिवाजी करंडे,नवनाथ लोंढे, दत्तात्रय करंडे,किरण करंडे,युवराज हुले, महादेव करंडे , लक्ष्मण करंडेयांसह ग्रामस्थांनी पाहीली.

यावेळी मंचर कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती देवदत्त निकम, भिमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीप वळसे पाटील, पंचायत समिती सदस्या श्वेता ढोबळे, अंकिता वाळुंज , बाळासाहेब घुले, रामचंद्र ढोबळे यांनी भेट दिली.

Related Articles

ताज्या बातम्या