
मंचर
कुकडी प्रकल्पांतर्गत येणाऱ्या डिंभे धरण ( हुतात्मा बाबू गेणू जलाशय) तुन उजव्या कालव्याला पाणी सोडण्याची मागणी जारकरवाडीचे उपसरपंच सचिन टाव्हरे माजी उपसरपंच शरद भोजने यांनी केली आहे सध्या वातावरणात उन्हाचा कडाका वाढू लागला असून, आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेती पिके यामुळे सुकत असून त्यांना पाण्याची गरज आहे.
यावर्षी पाऊस कमी असल्याने या परिसरातील जमिनीतील पाणी पातळी कमी असल्याने
पाण्याचा तुटवडा जाणवु लागला आहे
यावर्षी पावसाचे प्रमाण कमी आहे. आंबेगाव तालुक्यातही अनेक ठिकाणी विहीर, कुपनलिका, तलाव यांच्या पाण्याच्या पातळी झपाट्याने कमी होऊ लागली आहे सध्या शेतात असलेल्या शेती पिकांना पाण्याची गरज आहे. जमिनीची पाणी पातळी कमी असल्याने विहिरी, ओढ्या-नाल्यांना पाणी कमी आहे.

आंबेगावच्या पूर्व भागात व शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागाला डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. येथील शेती डिंभे धरणाच्या उजव्या कालव्यामुळे बागायती झाली आहे. मात्र, सध्या शेतामध्ये उभ्या असणाऱ्या पिकांना सध्या पाण्याची गरज आहे त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी वाढली आहे.
शेती पिके सुकू लागल्याने हे आवर्तन लवकर सोडावे, अशी मागणी उपसरपंच सचिन टाव्हरे माजी उपसरपंच शरद भोजने यांनी जलसंपदा विभागाकडे केली आहे.





