spot_img
spot_img
spot_img

आंबेगाव पंचायत समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

आंबेगाव पंचायत समिती सभापती पदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार

मंचर

जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचा निकाल सोमवारी (ता. 9) जाहीर झाला आहे आंबेगाव तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसने दहा पैकी आठ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व मिळवून
पंचायत समितीवरील सत्ता राष्ट्रवादीने कायम ठेवली आहे.

परंतु सभापती पदी कुणाची वर्णी लागणार याबाबत आंबेगाव तालुक्यातील जनतेचे लक्ष लागून राहिले आहे नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार का जुन्या लोकांना परत काम करण्याची संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आमदार दिलीप वळसे पाटील काय निर्णय घेतात याकडे आंबेगाव तालुक्याच्या जनतेचे लक्ष लागले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाकडून पंचायत समितीसाठी जारकरवाडी गणातून अंकिता वाळुंज, अवसरी बु पंचायत समिती गणातुन निलेश टेमकर, पिंपळगाव तर्फे म्हाळुंगे पंचायत समिती गणातुन शिवाजी निघोट, कळंब पंचायत समिती गणातुन उषा कानडे,पेठ पंचायत समिती गणातुन संजय पवळे, घोडेगाव पंचायत समिती गणातुन कैलासबुवा काळे, शिनोली पंचायत समिती गणातुन ज्योती पारधी, बोरघर पंचायत समिती गणातुन संजय गवारी हे उमेदवार निवडून आले आहेत तर शरदचंद्र पवार पक्षाच्या तुतारीच्या चिन्हावर पारगाव पंचायत समिती गणातुन श्वेता ढोबळे, चांडोली बु पंचायत समिती गणातुन प्रियंका वाघ हे उमेदवार निवडून आले आहेत

आंबेगाव तालुका पंचायत समिती सभापती पदावर यापूर्वी संजय गवारी, कैलासबुवा काळे, उषा कानडे यांनी सभापती म्हणून काम पाहिले आहे

जारकरवाडी पंचायत समिती गणातून अंकिता वाळुंज या सर्वाधिक तरुण वयाच्या बावीसाव्या वर्षी पंचायत समिती सदस्य पदी निवड झाली आहे. अंकिता वाळुंज यांना सभापती करावे अशी मागणी आंबेगावच्या पूर्व भागातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे

Related Articles

ताज्या बातम्या