spot_img
spot_img
spot_img

जोगेश्वरी महिला बचत गटाचा अनोखा उपक्रम

मंचर प्रतिनिधी

अवसरी खुर्द ता. आंबेगाव येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांचा आदर्शवत उपक्रम पहाडदऱ्यातील आदिवासी कष्टकरी महिलांच्या सोबत साजरा केला हळदी कुंकू समारंभ एकूण १५० आदिवासी महिलांना वाण म्हणून चटई वाटप करून थंडीच्या दिवसात मायेची ऊब दिली आहे. मकर संक्रातीनंतर महिला हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करून महिला आपल्या मैत्रिणी, नातेवाईक महिला यांना हळदी कुंकू साठी बोलाऊन वाण म्हणून एकांदि वस्तु भेट देतात अनेकदा वाण म्हणून आलेल्या वस्तु उपयोगी पडत नाही त्यामध्ये बहुतांशी वस्तु प्लास्टिकच्या असतात त्या दिवसानंतर त्या वस्तू अडगळीत पडतात त्याचा उपयोगही होत नाही. जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिला दरवर्षी एकत्र येत ठाकरवाडीत जाऊन दुसऱ्यांच्या शेतावर रोजंदारीने कामावर जाणाऱ्या आदिवासी समाजातील महिलांसाठी हळदी कुंकवाचे आयोजन करतात. याही वर्षी आज रविवारी १५० महिलांना थंडीच्या दिवसात उपयोगी पडणारे चटई चे वाटप करुन समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी यावेळी धामणीच्या माजी सरपंच रेश्मा बोऱ्हाडे, पहाडदऱ्याच्या माजी ग्रामपंचायत सदस्या सविता वायकर उपस्थित होत्या या कार्यक्रमाचे नियोजन जोगेश्वरी बचत गटाच्या अध्यक्षा निर्मला बिडकर, सचिव रेश्मा शिंदे, प्रतिभा खेडकर, सुषमा भोर, भाग्यश्री बिडकर, स्वाती पवार, जया शिंदे, राजश्री शिंदे, प्रमिला शिंदे, अर्चना दरेकर, सविता थोरात, राजश्री ढेपे, प्रियंका टेमकर यांनी केले होते. फोटो ओळी
पहाडदरा ता. आंबेगाव : अवसरी खुर्द येथील जोगेश्वरी महिला बचत गटाच्या महिलांनी आदिवासी ठाकर समाजातील १५० महिलांना चटई वाटप करून थंडीच्या दिवसात मायेची ऊब दिली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या