मंचर
आगमी काळात पार पडत असलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी केली आहे वळसे पाटलांच निरगुडसर गाव पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात येत आहे या जिल्हा परिषद गटात जिल्हा परिषद व पंचायत समिती भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचे आंबेगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे आंबेगाव पूर्व मंडलचे अध्यक्ष किरण बाबाजी वाळुंज यांनी संघर्षनामाशी बोलताना सांगितले
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातुन खडकवाडीचे किरण बाबाजी वाळुंज तर जारकरवाडी पंचायत समिती गणातुन जारकरवाडी येथील शैला गोरक्ष भोजने, पारगाव पंचायत समिती गणातुन पारगाव येथील मुक्ता तानाजी लबडे हे संभाव्य उमेदवार असणार आहे
पूर्वीचा असणारा अवसरी पारगाव जिल्हा परिषद गट व आता नव्याने तयार झालेला पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गट हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो जिल्हा परिषद व पंचायत समितीचे काही अपवाद वगळता या जिल्हा परिषद गटातून कायमच वळसे पाटलांचा विचाराचे म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निवडून गेले आहे
राज्यात राजकीय पक्षांची काही स्थित्यंतरे घडली त्याचे परिणाम आता तालुका पातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये दिसून येत आहे. पूर्वीची असलेली शिवसेना व राष्ट्रवादी ही दोन्ही पक्ष विभागली गेल्याने इच्छुक उमेदवारांची स्थानिक स्वराज्य संस्थेत वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात घड्याळ्याकडुन यापूर्वी निवडून गेलेले व जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राहिलेले विवेक वळसे पाटील यांनी निवडणूक लढण्याची तयारी केली आहे तर शिवसेना शिंदे गटाकडून निरगुडसर गावचे लोकनियुक्त सरपंच रवींद्र वळसे पाटील यांनी तयारी केली आहे तर भारतीय जनता पार्टी कडुन किरण बाबाजी वाळुंज यांनी तयारी केली आहे या जिल्हा परिषद गटात तिरंगी चौरंगी लढत होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात निवडणुकीत रगंत येणारं आहे
आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित पवार पक्ष) व अन्य घटक पक्ष एकत्रित लढतील अशी अपेक्षा होती परंतु तसे झाले नाही वरील पक्ष घटक पक्ष लोकसभा, विधानसभा एकत्रित निवडणूका लढविल्या होत्या
पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी करिता भारतीय जनता पार्टीने तयारी केली असून त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली आहे पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटातील गावांमध्ये घराघरापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते पोहचले आहेत या निवडूनुकीसाठी मायक्रो प्लॅन केलेला असून पारगाव जारकरवाडी जिल्हा परिषद गटात आमचे उमेदवार निवडून येतील असा विश्वास या जिल्हा परिषद गटाचे इच्छुक उमेदवार व भारतीय जनता पार्टी आंबेगाव पूर्व मंडल चे अध्यक्ष किरण वाळुंज यांनी संघर्षनामाशी बोलताना व्यक्त केला.





