मंचर प्रतिनिधी
पोंदेवाडी ( ता. आंबेगाव ) गावचे माजी उपसरपंच संदीप पोखरकर यांचा वाढदिवस पोंदेवाडी येथे सोमवार ( दि. ५ ) जानेवारी रोजी पोंदेवाडी येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. संदीप पोखरकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोंदेवाडी येथे पोखरकर यांच्या मित्र परिवाराने हितचिंतकांनी गर्दी केली होती संदीप पोखरकर हे गावचे उपसरपंच असताना त्यांनी गावात माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मोठे प्रमाणात विकास कामे केली आहेत. आंबेगाव तालुक्यात गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर म्हणून त्यांची एक वेगळी ओळख आहे. पोंदेवाडी गावच्या विकासाच्या रचनात्मक कामात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे गावातील गरीब गरजू कुटुंबांना त्यांनी कायमच मोलाचे सहकार्य केले जात आहे दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते माजी मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील यांचे ते खंदे समर्थक असून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील व खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांचे ते विश्वासू सहकारी आहेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त पोंदेवाडी गावात सांस्कृतिक कार्यक्रमाचे व मिष्टान्न भोजनाचे आयोजन करण्यात आले होते या सर्व कार्यक्रमांचे नियोजन अनिल वाळुंज युवा प्रतिष्ठान पोंदेवाडी यांनी केले होते.





