spot_img
spot_img
spot_img

जारकरवाडीत साकव पुल असून अडचण नसून खोळंबा

मंचर (प्रतिनिधी)

जारकरवाडी ( ता. आंबेगाव ) येथील खुडेवस्ती नजीक जिल्हा परिषदेच्या माध्यमातून लाखो रुपये खर्च करून पुल उभारण्यात आला आहे सदर साकव पुल वाहातुकीसाठी खुला न केल्याने या साकव पुलाची असून अडचण आणि नसुन खोळंबा असाच काहीसा प्रकार झाला आहे.
पुलावरुन वाहतुक सुरू न केल्याने वाहनचालकांना अडचणीचा करावा लागत आहे. संबंधित ठेकेदाराने पुलाचे काम सुरू करण्यापूर्वी साकव पुलाचे कामाच्या माहीतीची पाटी लावणे आवश्यक होते परंतु ती लावण्यात आलेली नाही.

निष्काळजीपणा करणार्या ठेकेदारांना अधिकारी पाठीशी घालत तर नाही ना असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. सदर पुलावर झाडाचे खोड व सिमेंट पाईप दगड अस्ताव्यस्त पुलावर पडले आहे पुलाच्या कठडेचे काम अपूर्ण अवस्थेत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

संबंधित ठेकेदाराने या पुलाकडे दुर्लक्ष केले आहे.तालुक्यात राजकीय पक्षाचे पुढारी ठेकेदार असून ते विकास कामांमध्ये कामाचा दर्जा राखत नाही. जारकरवाडी पारगाव रस्त्याला जोडणारा हा साकव पूल महत्त्वाचा आहे या रस्त्यावरून दररोज मोठ्या प्रमाणात शालेय विद्यार्थी व अन्य प्रवाशांची वाहनांची वर्दळ असते.

भीमाशंकर कारखाना सुरू झाला आहे त्यामुळे जारकरवाडी परिसरातील ऊस वाहतूक याच रस्त्यावरून होत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या साकव पुलाकडे लक्ष देऊन लवकरात लवकर साकव पूल सुव्वस्थित चालू करावा अशी मागणी जारकरवाडी ग्रामस्थांनी केली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या