spot_img
spot_img
spot_img

अबब..महिलेच्या पोटातून काढली तब्ब्ल साडेतीन किलोची गाठ!

मंचर (प्रतिनिधी)पारगाव (ता. आंबेगाव जि पुणे ) येथील ओम मल्टि स्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये प्रथमच एक गुंता गुंतीची शस्रक्रिया पार पडली. तब्ब्ल दोन तास चाललेल्या शस्रक्रियेत एका महिला रुग्णाच्या पोटातून साडेतीन किलोची गाठ काढण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे.

ओम हॉस्पिटलचे संचालक डॉ शिवाजी थिटे यांनी या शस्त्रक्रियेबाबत सांगितले की सदर महिला रोजंदारीच्या कामावर जात होती. गेली सहा महिन्यापासून तिच्या पोटात दुखू लागल्याने तात्पुरत्या स्वरूपात औषधं उपचार घेऊन चाल ढकल करत होती. मागील पंधरा दिवसांपासून महिलेच्या पोटात अचानक प्रचंड वेदना होऊ लागल्याने तिला ओम हॉस्पिटल पारगाव येथे ऍडमिट व्हावे लागले. त्यानंतर तिच्या पोटाची सोनोग्राफी करण्यात आली.

सोनिग्राफी रिपोर्ट मध्ये पोटात मोठ्या स्वरूपाची गाठ असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सर्जन डॉ.नरेंद्र लोहकरे यांनी तात्काळ शस्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. सदर महिलेच्या पोटाची ओम हॉस्पिटल मध्ये डाँ लोहकरे, डॉ शिवाजी थिटे व टीमने यशस्वीरित्या शस्रक्रिया केली. ही शस्रक्रिया अत्यल्प दरात केल्याने माहिलेच्या कुटुंबियांनी ओम मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे डॉ शिवाजी थिटचे आभार मानले

या यशस्वी शस्रक्रियेचे मेडिकल क्षेत्रात कौतुक केले जात आहे.

Related Articles

ताज्या बातम्या